सिंहगड रोडला संतोष हॉल चौकात ‘द बर्निंग कार’चा थरार' गाडीने पेट घेतला, बघ्यांकडून फोटो अन् विडिओ काढण्यासाठी गर्दी

The-vehicle-caught-fire-at-Santosh-Hall-Chowk-on-Sinhagad-Road

बातमी लावण्यासाठी संपर्क 94220 51341

आनंदनगर: काल रात्री पावणे दहाच्या सुमारास सिंहगड रोडला ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहायला मिळाला. संतोष हॉल चौकात एका कारला भीषण आग लागण्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यावेळी भर रस्त्यात चालत्या गाडीने अचानक पेट घेतला. परंतु गाडीचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 


संतोष हॉल चौकात आल्यानंतर चालकाला गाडीच्या इंजिन मधून धूर येत असल्याचे दिसल्याने प्रसंगावधान राखत चालक वेळीच त्यातून बाहेर पडले. त्यामुळे ते सुखरुप बचावले. मात्र या दुर्घटनेत ती  गाडी पूर्ण जळून खाक झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी आनंदनगरच्या अग्निशमन दलाने तात्काळ याची दखल घेत घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. 


भीषण आगीची घटना घडत असताना मात्र अतिउत्साही बघ्यांची गर्दी जमली, अशा आपत्तीच्या घटनांकडे दुलक्ष करत जो तो आपल्या मोबाइलला मध्ये या जळत्या कारचे फोटो आणि विडिओ काढण्यास पुढे सरसावत होते. अगदी गाडीच्या काही फुटाच्या अंतरावर जाऊन हे अतिउत्साही लोकं चमकोगिरी करत होते. या मुळे काही वेळासाठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.  



हे पण वाचा, 

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत २.१ किलोमीटर लांबीच्या उड्डाणपूलाला मंजूरी

भाजपच्या वतीने किरकटवाडी येथे विकास आराखड्यावर चर्चासत्रा संपन्न

चक्क! नांदेड फाटा ते किरकटवाडी रस्त्यावरच दाखल होणार फौजदारी गुन्हा?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.