भुकेल्या विद्यार्थ्यांसाठी बंधुत्व ग्रुपचे हात सरसावले; जेवणाचे डबे पाहून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी


धायरी, दि. २६ (सिंहगड रोड ऑनलाईन) – कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याने धायरी मधील गोरगरीबांच्या पोटाची चिंता वाढली आहे. अनेक गरीबांच्या आणि बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांच्या पोटाला अन्न मिळणे मुश्किल बनले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणांहून सामाजिक संस्था समोर येत आहेत. धायरी येथील बंधुत्व ग्रुपने बाहेरगावाहून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. हा डबा मिळाल्यानंतर विद्यार्थी डोळ्यात पाणी आणून बंधुत्व ग्रुपच्या माणुसकीचे आभार मानत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. या काळात नागरिकांना घरातून बाहेर न निघण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या काळात गरीब, मजूर तसेच रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांचा प्रश्न गंभीर झाला आहे. या लोकांच्या रोजगार आणि जेवणाची समस्या निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून पुण्यामध्ये मध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या जेवणाची भ्रांत झाली आहे.

विद्यार्थ्यांवर उपासमारीची आलेली वेळ पाहून धायरी येथील  बंधुत्व ग्रुप त्यांच्या पोटाला अन्न देण्यासाठी धावून आली आहे. बंधुत्व ग्रुप चे सर्व पदाधिकारी बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे पुरवत आहेत. हे डबे देताना मिलिंद पोकळे सोशल डिस्टंसिंगबाबतही जनजागृती करत आहेत. जेवणाचे डबे घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हातावर आधी सॅनिटायझरचे दोन थेंब टाकले जातात. सॅनिटायझरने हाताचे निर्जंतुकीकरण केल्यानंतरच जेवणाचे डबे संबंधित विद्यार्थ्यांच्या हातात दिले जातात. आपुलकीने त्यांची विचारपूस केली जाते. अश्या या परिस्थितीत आम्ही तुमच्या बरोबर आहोत असा संदेश विद्यार्थ्यांला देत आहेत. बंधुत्व ग्रुप च्या माणुसकीमुळे डबा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी समाजाने, शहरातील स्वयंसेवी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन बंधुत्व ग्रुप चे श्री. मिलिंदभाऊ पोकळे  यांनी केले आहे.


जाहिरात


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.