न्हरे गाव दि. 27(सिंहगड रोड ऑनलाइन)
कोरोना व्हायरसचा वाढता धोका ओळखून देशाला 21 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रभाव राज्यात वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण पुणे येथील सिंहगड रोड परिसरातील असल्याचे समोर आले होते त्यानंतर त्या भागांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
न्हरे गावात कोरोना विषाणू पसरू नये यासाठी न्हरे ग्रामपंचायतीकडून गावात प्रवेश करण्याऱ्या प्रत्येक वाहनांवर आणि सामानावर जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे.प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतीचे चार ते पाच कर्मचारी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. आपल्या देशात संचार बंदी असल्यामुळे भाजी विक्रेता, मेडिकल, किराणा दुकान याठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याने प्रत्येक 5/6 फुटावर चौकोनी बॉक्स तयार केले जेणेकरून गर्दी कमी होईल.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ग्रामपंचायतीने जंतूनाशक गाडी तयार करण्यात आलेली आहे. गाडीत ५००० लि. टाकी व जनसेट,मशीन लावून ५० फूट व २० फूट पाईप बसवून गाडी तयार केली. प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन जंतूनाशक फवारणी करत आहोत. सोसायटीतील नागरिक टाळ्या वाजवून आभार व्यक्त करत असल्यामुळे काम करण्यास प्रोत्साहन येत आहे असे सागर भूमकर यांनी सांगितले.
नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत पोलिस आणि सफाई कर्मचारी नागरिकांसाठी अहोरात्र झटत आहेत. मात्र बाहेर सर्व काही बंद असल्यामुळे पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांना प्रसंगी उपाशीपोटी आपले कर्तव्य बजवावे लागत आहे.
तुम्ही घरात राहून सहकार्य करा न्हरे ग्रामपंचायत आपली काळजी घेत आहे असे आवाहन सागर भूमकर यांनी केले.