धायरी येथे पुणे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शेतकरी ते ग्राहक ना नफा न तोटा या तत्वावर भाजीपाला उपक्रम

धायरी, दि. 30 (सिंहगड रोड ऑनलाईन) कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी संपूर्ण  देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. या लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही किराणा माल, मेडिकल, हॉस्पिटल, भाजी मंडईसह अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. प्रशासन सात्यत्याने आपली जबाबदारी पार पाडत आहे. करोना संसर्ग वाढू नये या साठी डॉक्टर ,पोलीस प्रशासन, सफाई कामगार अहोरात्र झटत आहेत. करोना चा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी व ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी धायरी येथे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धायरी येथे पुणे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती पोकळे व वीर उमाजी नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने  शेतकरी ते  ग्राहक असा ताजा भाजीपाला ना नफा ना तोटा या तत्वावर विक्रीसाठी पार्क व्ह्युव, चव्हाण बाग, डी.एस.के. रोड, धायरी येथे भाजीपाला उपलब्ध करून दिला. यात सोशल डिस्टन्स ठेवून व सरकारी सर्व निउम व अटी पाळून भाजी विक्री करून धायरीतील नागरिक व शेतकरी बांधवाना सहकार्य करण्यात आले. याच वेळी या ठिकाणी सोशल डिस्टन्स चे महत्व ही सांगण्यात आले

या वेळी या यावेळी स्वाती पोकळे, दीपक लक्ष्मण चव्हाण - अध्यक्ष  वीर उमाजी राजे नाईक प्रतिष्ठान, उमेश डाकवे, महेंद्रदादा भोसले, अतुल देशमुख,  शार्दुल देशमुख,ओमकार देशपांडे ,आधार शिंदे गोकुळ लामतुरे, आदींनी ग्राहक व शेतकरी तसेच त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स कसा राहील याची काळजी घेतली, जेणेकरून प्रत्येक नागरिकामधील आणि ग्राहकामधील शासनाच्या नियमावली प्रमाणे सुरक्षित अंतर राहील. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी व अत्यावश्यक काम नसल्यास घराबाहेर पडू नये असे आवाहन पुणे महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा स्वाती पोकळे यांनी यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.