निलेश गिरमे यांनी जपली माणुसकी; २०० हुन अधिक मजूर कुटुंबांना केले किराणा मालाचे वाटप

धायरी, दि. 31 ( सिंहगड रोड ऑनलाईन ) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत निलेश गिरमे हे त्यांच्या गोरगरीब मजूरांच्या मदतीला धावून गेले आहेत. आत्तापर्यंत  सुमारे 200 हुन अधिक गरीब मजूरांच्या कुटुंबातील अबाल-वृद्धांच्या पोटात दोन घास अन्न जावे यासाठी प्रत्येक कुटुंबात रोजच्या खाण्यासाठी लागणाऱ्या किराणा मालाचे  वाटप केले.

बाहेर गावावरून कामासाठी आलेले मजूर, घरकाम करणारी कुटूंब, वॉचमन, मिळेल ते काम करणारे मजूर त्यांच्या कुटूंबापुढे एक वेळचे जेवण कसे भेटलं याची चिंता आहे, अशी बरीच कुटुंब धायरी मध्ये राहत आहेत त्याच्यावर उपासमारीची वेळ येत आहे हे पाहून अश्या २०० हुन अधिक कुटुंबापर्यंत निलेश गिरमे यांनी माणुसकी जपत मोफत किराणा माल घर पोहच केला

तसेच धायरी परिसरातील आंबेडकर नगर येथे अनेक गरीब मजूर कुटुंबे राहतात. या सर्वांचे हातावर पोट आहे. मात्र कोरोना विषाणूला रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे या सर्वांच्या हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे या सर्व मजूर कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही बाब समजताच या धायरीतील निलेश गिरमे हे या कुटुंबांच्या मदतीला धावून गेले.

निलेश गिरमे यांनी संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने धायरी येथील सुमारे २०० हुन अधिक गरीब मजूर कुटुंबांना धान्याचे वाटप केले. प्रत्येक कुटुंबाला २ किलो पीठ, १ किलो साखर, १ किलो पोहे, १ किलो तेल, १किलो मूगडाळ १किलो तुरडाळ लाल मिरची पावडर, मसाले तसेच टूथपेस्ट, आंघोळीचे साबण घर पोहच देण्यात आले. उपाशी राहण्याची वेळ आलेली असताना त्यांच्या पोटाला मोठा आधार मिळाला आहे. त्यामुळे या गरीब मजूर कुटुंबांनी निलेश गिरमे यांचे आभार मानले आहेत.

ज्या कुटुंबाना काम नसल्यामुळे दररोज च्या जेवणाची भ्रांत झाली त्यांना यापुढे ही मदत केली जाणर आहे. त्यासाठी गरजू कुटूंबानी संपर्क साधावा आपल्याला आवश्यक तो किराणा माल घरपोहच केला जाईल असे सांगितले, ही सेवा धायरी पुरती मर्यादित असेल तसेच जो पर्यंत प्रशासनाचे आदेश येत नाहीत तो पर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा आरोग्याची काळजी घ्या असे निलेश गिरमे यांनी आवाहन केले

 या वेळी बाड सर, दत्ता शिंदे, मनोज चव्हाण, संजय गायकवाड, लोकेश राठोड तसेच आंबेडकर नगर मधील तरुण आदींची उपस्थित होते त्यांची या कामी मदत झाली.




जाहिरात






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.