पुणे दि.२६ (सिंहगड टाईम्स) पुणे विभागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना. सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांची तपसणी करणा-या डॉक्टर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला असून, रुग्णसेवा व अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या मंडळीना देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याची बाब प्रकर्षाने समोर येत अाहे. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रमाणे रुग्णांच्या जीवासाठी कोरोनाशी लढा देणाऱ्या डॉक्टरांची सुरक्षितता तेवढीच महत्वाची आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने देणगी नव्हे तर डॉक्टरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फेस शिल्ड मास्कचे वितरण करण्यात येत अाहेत.
करोना रोगावर नियंत्रण आणताना डॉक्टर्स आणि त्यांच्या सह काम करणा-या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याची असलेली गरज लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेस डाॅ.सेल ने हा उपक्रम राज्यभर सुरु केला आहे. राज्यभरात दीड लाख फेस शिल्ड व मास्कचे वाटप करण्यात येत असून याचाच भाग म्हणून आज पुणे शहरात सदर फेस शिल्डचे वितरण करण्यात आले. रुग्ण तपासणी करताना अत्यंत गरजेची असलेले हि फेस शिल्ड उपलब्ध करून दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस डाॅ. सेल ने घेतलेल्या या उपक्रमाचे सर्व डॉक्टर्स मंडळीनी कौतुक केले. व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. खा. श्री. शरदचंद्रजी पवार व डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांचे आभार मानले.
कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली युद्धभूमी समजून धैर्याने सेवा देत आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेस शिल्ड देण्यात येत आहे.पुण्यात १६ वैद्यकीय संघटनामार्फत फेसशिल्ड चे वितरण करण्यात येत आहे,' असे डॉ.सुनील जगताप यांनी सांगितले.