उपाशी पोटी आणि वाईट अवस्थेत असलेल्या मजुराच्या मदतीला रुपेश दमिष्टे गेले धावुन, महापालिकेच्या निवारण केंद्रात केले भरती

उपाशी पोटी आणि वाईट अवस्थेत असलेल्या मजुराच्या मदतीला रुपेश दमिष्टे गेले धावुन,

धायरी, दि. 31 कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी संपूर्ण  देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. या काळामध्ये कामासाठी धायरी मध्ये आलेल्यांची संख्या जास्त जास्त, त्यांच्या वर आता उपासमारीची वेळ येत आहे, अशाच एका मजुराच्या मदतीला रुपेश दमिष्टे धाऊन गेले.

रुपेश दमिष्टे यांनी धायरी मध्ये लॉकडाऊन सुरवाती पासूनच सामाजिक जबाबदारी समजुन यामध्ये स्वतःला झोकून दिले आहे. पोलीस प्रशासनाला गर्दी हटवण्यासाठी संध्याकाळी 6 ते 9 वेळे दरम्यान स्वतः धायरी चौकामध्ये पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी तत्पर असतात, बंधुत्व ग्रुप तर्फे मोफत जेवण गरजू पर्यंत पोहचवणे, सोशल डिस्टन्सींग चे महत्त्व पटवून देणे, या कामामध्ये दिवसभर व्यस्त असताना त्यांना साविञी कार्यालय च्या अलिकडे हिना मटण शॉप,ओट्यावर एक ईसम बेवारस पणे उघड्यावर झोपत असल्याचे दिसताच त्यांनी चौकशी केली असता तो तरुण एक बांधकाम ठेकेदारकडे काम करत होता करोना च्या पार्श्वभूमीवर ठेकेदार गावाकडे निघून गेल्यामुळे या तरुणावर  उपासमारी ची वेळ आली होती बिचारा मजूर तीन चार दिवसांपासून उपाशी पोटी झोपत होता. ताबोडतोप रुपेश दमिष्टे  यांनी त्याच्या जेवणाची आणि पिण्याच्य पाण्याची सोय करून लायगुडे हॉस्पिटल येथे उपचार केले व नंतर महापालिकेच्या निवारा केंद्रमध्ये (नवले मनपा शाळेत) भरती केले. पुणे महानगर पालिकेने करोनाच्या पार्श्वभूमीवर नवले मनपा शाळा,न-र्हे रोड,वडगाव खुर्द, धायरी फाटा येथे लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या सर्व मजुरांसाठी तात्पुरते निवारा केंद्र चालू केले आहे

.
त्या मजुरांची चौकशी केली असता त्याचे नाव संतोष डोईफोडे असून बांधकाम व्यवसायामध्ये सेंट्रीग करणाऱ्या ठेकेदाराकडे तो कामाला होता करोना मुळे काम बंद झाल्याने ठेकेदार त्याला रस्त्यावर सोडून गेला. रुपेश दमिष्टे त्याच्या मदतीला गेले आणि महापालिकेच्या निवारण केंद्रात त्याला भरती केले. त्यावेळी त्या वंचित मजुराने रुपेश दमिष्टे व त्यांच्या मित्रपरिवाराचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.