नगरसेवक प्रसन्न दादा जगताप यांच्या कडून गरजूंना जेवणाच्या पॅकेटस् चे वाटप



सिंहगड रोड दि. 10 (सिंहगड रोड ऑनलाईन)कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. देशातील सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हि पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना  नगरसेवक प्रसन्न दादा जगताप यांच्या कडून जेवण वाटप केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिक, विद्यार्थी, पोलीस, आरोग्यसेवक, महापालिका कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे.  पुणे शहर परिसरात लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळी बंद असल्याने अनेकजनांंच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना पोटभर पुरेल एवढे जववणाचे पॅकेट्स देत आहोत. यामध्ये विद्यार्थी, पोलीस, महापालिका कर्मचारी, वॉचमन  आरोग्यसेवकांचा समावेश आहे. याबरोबरच मास्कचेही मोफत वाटप केले जात आहे. ही सेवा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत.डॉक्टर, नर्स, वॉचमन, एकाकी राहणारे नागरिक, पोलीस, सफाई कामगार यांना त्यांच्या मागणीनुसार कामाच्या ठिकाणी प्रसन्न दादा जगताप यांचे कार्यकर्ते जाऊन जेवण देत आहेत

संचारबंदीच्या पार्श़्वभूमीवर सिंहगड रोड परिसरात प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या फूड पॅकेट वाटप उपक्रमाअंतर्गत आज दुपारी सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय,सनसिटी पोलिस स्टेशन, हायवे पोलिस स्टेशन,लायगुडे दवाखाना परिसरातील नागरिक व त्यांचे कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच इतर अनेक ठिकाणी फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले.हा संपूर्ण परिसर सील करण्यात आल्याने येथे अतिशय मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.