निलेश गिरमे यांच्याकडून सिंहगड रोड वरील पोलिस, हॉस्पिटल स्टाफ, सफाई कामगार आदींना मास्क वाटप


सिंहगड रोड दि. १० कोरोना व्हायरस विरोधात देशव्यापी युद्ध सुरु आहे. लॉकडाऊन बरोबरच नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात येत आहे. आता ओडिशामध्ये देखील नागरिकांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निलेश गिरमे यांनी सिंहगड रोड परिसरात उत्तम प्रकारच्या मास्क चे वाटप केले.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालण्यास प्राधान्य दिले जात आहे. घरातून बाहेर पडताना मास्क घालणे बांधनकारक करण्यात आले आहे. राज्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

आज दुपारी निलेश गिरमे यांच्या कडून संकल्प प्रतिष्ठान च्या वतीने एक छोटीशी सामाजिक जबाबदारी घेऊन सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, अभिरुची पोलिस स्टेशन, हायवे पोलिस स्टेशन,लायगुडे दवाखाना परिसरातील नागरिक व त्यांचे कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच इतर अनेक ठिकाणी उत्तम प्रकारच्या मास्कचे वाटप करण्यात आले. 

करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.