खडकवासला ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरपंच सौरभ मते यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा निर्जंतुकीकरण कक्ष

खडकवासला दि.11 (सिंहगड रोड ऑनलाईन) – कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता खडकवासला येथे ग्रामपंचायतीने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरपंच सौरभ मते यांच्या संकल्पनेतून आगळावेगळा निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षातून जाणारी प्रत्येक व्यक्ती आणि वाहनांवर सोडियम हायपोक्लोराईंडची फवारणी स्वंयचलित यंत्राद्वारे केली आहे.

खडकवासला मुख्य रस्त्यावर 30 फूट लांब आणि 16 फूट रुंद मंडप तयार करुन स्वंयचलित मशिनद्वारे मंडपामध्ये जंतुनाशक औषधांची फवारणी होते. या निर्जंतुकीकरण कक्षातून पुणे पानशेत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी आणि इतर मोठ्या वाहनावर औषध फवारणी केली जाते. 30 ते 40 गावातील अत्यावश्यक सेवेसाठी ये-जा करणाऱ्या वाहनांना या कक्षाच्या उपयोग होत आहे. यामुळे व्यक्ती आणि वाहने यांचे निर्जंतुकीकरण होण्यास यामुळे मोठी मदत होत आहे. ये जा करणाऱ्या नागरिकांडून खडकवासला ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त करण्यात येते आहेत.

पुणे आणि आजूबाजूच्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा व व्यापक जनकल्याणाचा विचार करुन हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार  हे मशिन बसविण्यात आले असून अत्यावश्यक कामाकरिता बाहेर पडणार्‍या नागरिकांनी या मंडपातून वाहनांवर सदरचा फवारा घेऊनच पुढे जावे, असे अवाहन खडकवासला ग्रामपंचायतीच्या वतीने सौरभ मते यांनी केले पवार यांनी केले आहे.


https://www.facebook.com/135432326488773/posts/3084237521608224/



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.