धायरी १३ (सिंहगड रोड ऑनलाईन) शहरात लाॅकडाऊनमुळे खाजगी वाहतूक पूर्ण पणे बंद होती आणि त्यातच पोटात कळा सुरू झालेल्या,जोडीला कोणीही नाही, हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी एकही खाजगी गाडी किंवा रुग्ण वहिनी मिळत नव्हती अशातच नांदेड फाट्यावरून पी एम पी एम एल चे चालक फिरोज हमीद खान व वाहक विजय रामचंद्र मोरे हे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना डेक्कन जिमखाना येथे घेऊन निघाले असता धायरी फाटा येथे एक गर्भवती महिला थांबली असल्याचे त्यांना दिसले, त्यांनी बस मधील कर्मचाऱ्यांना उतरण्याची विनंती करून सदर महिलेला कमला नेहरू हाॅस्पीटल येथे पोहचले. डाॅक्टरांनी लगेचच त्या महिलेवर उपचार सुरू केले. सर्वच स्थरातून या राम रहीम जोडीवरती कौतुक केल जात आहे.
खान आणि मोरे यांनी दाखविलेल्या माणुसकीचे कौतुक म्हणून शिवसेना खडकवासला व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने या दोघांचा आज शाल, श्रीफळ, सॅनिटायजर व जीवनावश्यक वस्तूंचे किट देऊन सत्कार करण्यात आला, या प्रसंगी विभाग प्रमुख निलेश गिरमे, मनोज चव्हाण, संजय गायकवाड, समीर बडदे, विजय कणसे, निलेश पोळ, प्रशांत जाधव, लोकेश राठोड हे उपस्थित होते.