वारजे परिसरातील ५० कुटुंबाना १ महिन्याचा किराणा वस्तू ,जीवनोपयोगी साहित्य

वारजे दि. १५  (सिंहगड रोड ऑनलाईन)कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. देशातील सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हि पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना  सचिन दांगट मित्रपरिवरा कडून जीवनाउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले

सचिन दांगट मित्र परिवाराचे वतीने मंगळवारी वारजे परिसरातील अल्प उत्पन्न गटातील ५० कुटुंबाना १ महिन्याचा किराणा,जीवनोपयोगी वस्तू घरपोच देण्यात आल्या.यामध्ये ५ किलो गहू, ५ किलो तांदुळ, १ किलो तूरडाळ, २ किलो तेल, २ किलो साखर, १/२ किलो चहा पावडर , १ किलो मीठ, हळद , मिरची पावडर, जिरे , मोहरी प्रत्येकी १०० ग्रॅम, अंघोळीचे साबण २, कपड्याचे साबण २, टुथपेस्ट १०० ग्रॅम, खोबरेल तेल इत्यादी वस्तुंचा सामावेश होता . या वाटपासाठी सचिन दशरथ दांगट स्वीकृत सभासद , पुणे मनपा, दिपकमामा भोसले, ऋषिकेश रजावात, आनंद देशपांडे, अमजद अन्सारी, चेतन मेस्त्री, किरण साबळे यांनी परिश्रम घेतले.
------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.