नगरसेविका मंजुषा नागपुरे यांच्या कडून सिंहगड रोड परिसरात ४ निर्जंतुकिंकरण कक्षाची ची उभारणी

सिंहगड रोड दि.१७ (सिंहगड रोड ऑनलाईन) कोरोना व्हायरसचा प्रसार पुणे शहरात झपाट्याने होत असताना, तो रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मेहनत घेत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा व व्यापक जनकल्याणाचा विचार करुन नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी आपल्या प्रभागा मध्ये ४ ठिकाणी करोना निर्जंतुकीकरण उभारले आहेत.

सिंहगड रोड परिसरात "अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहे आलेले नागरिक, अत्यावश्यक सेवा पुरवणारे, करोना विरोधी काम करणारे पोलीस प्रशासन, विविध सामाजिक संस्थचें कर्मचारी, पालिका सफाई कर्मचारी आदींना करोना पासून बाधा होऊ याची सामाजिक जबाबदारी घेऊन माणिक बाग पेट्रोल पम्प(विश्वेश्वर बँक जवळ), वीर तानाजी चौक (ब्रह्मा हॉटेल समोरील गल्ली), चरवड मैदान बाहेर (आहोक ट्रेडर्स जवळ, सनसिटी रस्ता) व हिंगणे चौक (देवीच्या मंदिरासमोर) उभारण्यात आले आहेत. सदर कक्ष हे वर्दळीच्या आणि प्रभागाची भौगोलिक रचना लक्षात घेऊन उभारण्यात आले असून अनेक नागरिक प्रशासन कर्मचारी त्याचा लाभ घेताना दिसून येत आहे.

या वेळी अत्यावश्यक कामाकरिता बाहेर पडणार्‍या नागरिकांनी निर्जंतुकीकारण कक्षातून अंगावरी फवारा घेऊनच पुढे जावे, तसेच आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा असे अवाहन नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी केले.या कामी रोहित इंगळे, नितीन शेंडकर, दिनेश कोहिनुरे, मयूर पांगरे, विशाल वाघडे, अक्षय गुजराथी, समीर महाडिक, अश्विन सावंत आदींची मदत झाली.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3153804884641530&id=100000361484664

जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.