वडगाव बुद्रुक मध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


सिंहगड रोड दि.१८ (सिंहगड रोड ऑनलाईन) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन असल्यामुळे गोर, गरीब, कष्टकरी कुटुंबातील नागरिकांना नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड मित्र परिवाराच्या पुढाकाराने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे  किट तयार करून  १६४७ परिवारांना सोशल डिस्टसिंग पाळत  किट वितरित करण्यात आली आहे .  वडगाव बुद्रुक मधील विकास नगर , तोरणानगर ,चरवड वस्ती ,घुलेनगर ,वडगावचा राजा लेन , रेणुकानगरी - कीर्तीनगर ,रायगडनगर , शिंदे हाईट्स लेन , गोसावी वस्ती , जाधवनगर, शांतीनगर इत्यादी भागात सदर मदत वितरित करण्यात आली आहे .

   कोरोना निर्मूलनासाठी सुरुवातीपासून नगरसेवक हरिदास चरवड मित्र परिवार अग्रेसर राहिला आहे  विविध टप्प्यावर उपाययोजनावर भर देण्यात आला आहे . पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण अाढल्या पासूनच सुरुवातीला सोशल मीडिया मार्फत जनगागृतीला सुरुवात करण्यात  आली होती त्यानंतर  पहिल्या टप्प्यात - संपूर्ण प्रभागात  जेटिंग मशीनद्वारे  औषध फवारणी करून प्रभागातील जास्तीत जास्त भाग निर्जंतुकिरण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला .

दुसऱ्या टप्प्यात  लॉकडाउनच्या पाश्वभूमीवर अडचणीत असलेल्या कष्टकरी ,गोर - गरीब जनतेला मदतीचा हात म्हणून अन्नधान्य वितरित करण्यात आले. प्रभागातील ६५० कुटुंबाना सदर अन्नधान्य वितरित करण्यात आले. तदनंतर

 तिसऱ्या टप्प्यात प्रभागातील  लॉकडाउनमुळे  अडकून पडलेल्या विद्यार्थी , गरजू नागरिक , बेघर नागरिकांसाठी अन्नछत्राची सुरुवात करून दररोज भाजी -पोळीचे पाकिटे श्रीसाई मंदिर हायवे येथे वितरित करण्यात येतात. गेल्या १६ दिवसापासून हा उपक्रम सुरु असून आजतागायत जवळ-जवळ ३००० पाकिटे या उपक्रमाद्वारे वितरित काण्यात आली आहे . हा उपक्रम अविरत पूढे सुरु असणार आहे .

चौथ्या टप्प्यात प्रभागातील गरजू जेष्ठ नागरिकांना घरपोच औषधें देण्यात आली . तसेच वडगाव बुद्रुक मधील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी  मास्क आणि हॅन्डग्लोज वितरित करण्यात आले .सदर किराणा आणि जीवनाश्यक वास्तूच्या किटच्या वितरतानाचा उपक्रम हा मोहिमेतील पाचवा टप्पा असून .आगामी सहाव्या टप्यात प्रभागात व्यापक स्वरूपात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे . पुण्यनगरीचे खासदार मा .गिरीशभाऊ बापटसाहेब आणि आमदार मा .भिमरावअण्णा तापकीर दररोज प्रभागातील परिस्थितीचा आढावा घेत असून मोलाचे मार्गदर्शन करीत आहे त्याबद्दल आम्ही सर्व आभारी आहोत पार्श्वभूमीवर देशात 3 मे पर्यंत लॉक डाऊन असल्यामुळे गोर, गरीब, कष्टकरी कुटुंबातील नागरिकांना नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड मित्र परिवाराच्या पुढाकाराने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे  किट तयार करून  १६४७ परिवारांना सोशल डिस्टसिंग पाळत  किट वितरित करण्यात आली आहे . वडगाव बुद्रुक मधील विकास नगर , तोरणानगर ,चरवड वस्ती ,घुलेनगर ,वडगावचा राजा लेन , रेणुकानगरी - कीर्तीनगर ,रायगडनगर , शिंदे हाईट्स लेन , गोसावी वस्ती , जाधवनगर , शांतीनगर इत्यादी भागात सदर मदत वितरित करण्यात आली आहे. या उपक्रमात संजय पवळे , शहाजी  वांजळे ,बाळासाहेब' पोरे , चंद्रकांत पवळे ,डॉ.विवेक काळे , केदार जाधव , विशाल कांबळे , विकास कांबळे ,अनंता कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले असून पुढेही मदत वितरणाचा हा उपक्रम सुरु असणार आहे .



जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.