खडकवासला दि. १९ (सिंहगड रोड ऑनलाइन) करोनाच्या पार्श्वभूमीवर खडकवासला परिसर प्रशासनाने सील केला असून यामुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. अश्या परिस्थितीमध्ये जय भवानी प्रतिष्ठाच्या वतीने गोरगरीब मजुरांना घरपोहच जेवणाचे वाटप केले जात आहे.
कोरोनाच्या महामारीत प्रशासनाने दिलेल्या खडकवासला सिलच्या आदेशा नंतर खडकवासला येथील जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने गावातील गरजू लोकांना घरपोच अन्न पुरविले जात आहे. जवळपास 300 लोकांनां दररोज ही सेवा पोचविण्याचे कार्य विद्यमान सदस्य श्री.अनिकेत मते व श्री.आशिष मते यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस श्री.आनंद मते व शिवसेनेचे हवेली तालुका प्रमुख श्री.संदीप मते आपल्या कार्यकर्त्यां बरोबर करत आहेत.