नांदेड सिटी, दि.२३ राज्यात करोना चा प्रादुर्भाव वाढल्याने सर्व नागरिक घरातच आहेत. अश्या परिस्थितीत नांदेड सिटी नजीक नदीपात्रात कचरा जाळण्यात येत असल्याने धुराचे लोट नांदेड सिटी परिसरात पसरले जात आहेत यामुळे रहवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अश्या घटना वारंवार घडत असून नांदेड ग्रामपंचायत या कडे दुर्लक्ष करत आहे.
नांदेड गावातून गोळा केलेला कचरा नदी पत्रामध्ये जमा केला जातो, त्यानंतर तो कंत्राटदाराकडून उचलला जातो परंतु काही अज्ञात लोकांकडून तो त्याच ठिकाणी जाळला जातो. या धुराचे लोट नांदेड सिटी मध्ये पसरले जातात त्यामुळे नांदेड सिटी रहवाश्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
कचरा उचलणाऱ्या कंत्रातदाराशी बोलले असता त्यांनी सांगितले सध्या उन्हाळा चालू आहे काही वेळा कचऱ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असतात उन्हामुळे ते गरम होऊन पेट घेतात, एकीकडे नांदेड गावचे ग्रामसेवक सांगतात की काही अज्ञात नागरिक हा कचरा पेटवतात आणि कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार कचऱ्यात असणाऱ्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीच्या घटना होत आहेत, यामुळे कचरा नक्की कोण पेटवत आहे? हा प्रश्न अनुउत्तरित आहे. नांदेड ग्रामपंचायतीने या बाबत ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.