प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक रिक्षा, चारचाकी वाहने, यांना रस्त्यावर बंदी घातल्याने खाजगी वाहतूक पूर्ण बंद आहे. महानगर पालिकेच्या बसेस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करत आहेत. अश्या परिस्थिती मध्ये पी.एम. पी.एल. च्या बस चालक आणि वाहकाकडून माणुसकीचे दर्शन झाले.
आज दुपारी सिहगड रोड माणिक बाग परिसरात एक गर्भवती महिला भर उन्हात दुपारी १२:३० वा.चक्कर येऊन पडली असता नांदेड सिटी ते डेक्कन मार्गे प्रवासी घेऊन जात असताना बस मधील ड्रायव्हर नाव फिरोज खान व कंडक्टर श्री.विजय रामचंद्र मोरे यांनी बस मधील प्रवाशांना खाली उतरवून सदर महिलेस कमला नेहरु रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले .
आजच्या परिस्थितीत राम रहीम यांचे एकत्रित दर्शन पहावयास मिळाले.