धायरी दि. २५ (सिंहगड टाईम्स) कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. देशातील सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. हि पार्श्ववभूमी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी ची जाणीव लक्षात ठेवून गरजू नागरिकांना कर्तव्यदक्ष नगरसेवका अश्विनी किशोर पोकळे यांनी माणुसकी जपत आपल्या प्रभागातील गोरगरीब गरजू नागरिकांना मदतीचा हात देत किराणा आणि जेवणाच्या पॅकेट्स चे वाटप केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केलेल्या आवाहनानुसार सामाजिक बांधिलकी जपत गरजू गोरगरीब, मजुरवर्ग यांना आवश्यकतेनुसार दोन वेळचे जेवण देण्यात येत आहे, ज्या गोरगरीब नागरिकानावर उपासमारीची वेळ आली आहे त्यांना कोरडा शिधा देण्यात येत आहे याबाबत बोलताना अश्विनी पोकळे यांनी सांगितले, की पुणे शहर परिसरात लॉकडाऊनमुळे हॉटेल, खानावळी बंद असल्याने अनेकजनांंच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून दोन हजाराहून अधिक गरजूंना पोटभर पुरेल एवढे जेवणाचे पॅकेट्स आणि किराणा देत आहोत. यामध्ये विद्यार्थी, कंपन्यांमध्ये काम करणारे कामगारांचा समावेश आहे. ही सेवा आम्ही पुढेही चालू ठेवणार आहोत. गरजू गोरगरिबांना त्यांच्या मागणीनुसार कामाच्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन जेवण देत आहेत. तसेच या कठीण प्रसंगी स्वतःला समाज कार्यात झोकून देत निर्जंतुकिंकरण तयार करणाऱ्या व सहकार्य केलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे किशोर पोकळे यांनी आभार मानले.
या वेळी माजी उपसरपंच कुंदन बेनकर, विनोद खंडू पोकळे, दिपक पोकळे, राहुल पोकळे,अंकुश आखाडे, पाणीसंघर्ष ग्रुप मेंबर आदींचे सहकार्य लाभले.