९ वा महिना असलेल्या गर्भवतीच्या मदतीसाठी धावून आली पी एम पी एम एलची बस हिंगणे वरून सोडले रत्ना हॉस्पिटल सेनापती बापट रोडला

हिंगणे दि. २७ (सिंहगड टाईम्स) आज रोजी सकाळी ८ च्या सुमारास हिंगणे बस स्टॉपला ९ महिन्याची गरोदर महिला आणि नातेवाईक रत्ना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी खाजगी वाहनांची वाट पाहत उभी होती पण लॉकडाऊन असल्याने हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी कोणतीही सोय उबलब्ध होत नसताना स्वारगेट डेपोतील अत्यावश्यक नांदेड सिटी ते डेक्कन वाया कर्वेनगर ही बस त्याच वेळी तिथून जात असताना बस मध्ये त्या महिलेला बसवून रत्ना हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पोहच करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगर पालिकेच्या बसेस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करत आहेत. आज दि.२७.०४ .२०२० रोजी स्वारगेट आगारा कङील अत्यावश्यक सेवेतील नांदेड सिटी ते डेक्कन व्हाया कर्वेनगर या मार्गावर वाहक क्र .४१०१ श्री. विशाल मासुळे व ब.चालक ४३४६ श्री. अक्षय भोसले हे बस क्र .७१८ वर ड्युटीस होते हिंगणे बस स्टाँप येथे बस आलेवर सौ .अमृता तावरे या गर्भवती महिलेने विनंती केलेनुसार त्यांना रत्ना मेमोरियल हाँस्पीटल सेनापती बापट रोड येथे  पुढील उपचारा करिता सुखरूप पोहचत करुन पुढील खेपा पुर्ण केल्या, या वेळी गरोदर महिलेची अवस्था पाहून बस मधील प्रवाशांनी प्रसंगावधन दाखवत वाहक आणि चालकांना विनंती केली आम्ही ज्ञानेश्वर पादुका चौकात उतरतो तुम्ही महिलेला घेऊन हॉस्पिटलमध्ये जा, अश्याप्रकारे प्रवाशांनाही माणुसकी जपली.

नेहमीच पी एम पी एम एल चे ड्राइवर कंडक्टर उद्धटपणे वागतात असे आपण ऐकत असतो पण प्रसनावधन दाखवत त्यांनी ९ महिन्याच्या गरोदर महिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, सदर महिलेशी संपर्क साधला असता त्यांनी वाहक आणि चालक यांचे आभार मानले, रत्ना हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना पुढच्या उपचारासाठी ऍडमिट करून घेतले आहे. रत्ना हॉस्पीटल चे डॉ. देवकर यांनीही एक एक आपुलकी म्हणून त्यांना चहा पाणी दिले व वाहक चालकाचे कौतुक केले तसेच त्यांचे रत्ना हॉस्पिटल कडून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल असे सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.