करोनाच्या पार्श्वभूमीवर किशोर झरांडे आणि स्वयंभू प्रतिष्ठान कडून गरीब मोलमजुरांना मदतीचा हात

वडगाव बु. दि. १८ (सिंहगड रोड ऑनलाइन)कोरोना चा वाढता प्रादूरभाव रोखण्यासाठी शासनाने केलेल्या संचारबंदी मुळे अनेक छोट्या कंपन्यांमधील कामगार,मजूर, त्यांची लहान मुले तसेच हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची सर्वात जास्त बिकट अवस्था झाली आहे. देशातील सर्व व्यापार-व्यवहार ठप्प झाले आहे. त्यामुळे गरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थिती मध्ये सामाजिक बांधिलकी जपत किशोर जरांडे यांनी स्वयंभू प्रतिष्ठन वाडगाव बु. मार्फत किराणा मालाचे वाटप केले जात आहे.

वडगाव मधील अपंग, मोलमजुर, गरीब लोकांना स्वयंभु प्रतिष्ठान च्या वतीने  गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, डाळी, मसाले असा असा किराणा मालाचे वाटप करण्यात आले, जेणेकरून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार नाही. हे वाटप असताना अक्षरशः लोकं मुलाबाळांच्या शपथा घेवून सांगत होते की खाण्यासाठी घरात काहीच नाही, असे किशोर झरांडे यांनी सांगितले त्यामुळे जितकी मदत तुमच्या भागात होईल तेवढी करा असे आवाहन केले.

यावेळी विपुल झरांडे, योगेश खपके, सनी पंडीत, संतोष गोडबोले, निलेश बगाडे, प्रविन थोरे, हरिष कटके, सुरज धायगुडे, अंकित पंडीत, अनिकेत गायकड आदिंची किराणा वाटताना मदत झाली.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.