वडगाव, दि. १८ ( सिंहगड रोड ऑनलाईन ) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आहे, अश्या काळात माणुसकी जपत कै. सुरेश (आक्कू) विठ्ठलराव जाधव यांच्या स्मरणार्थ ऋषिकेश सुरेश जाधव मित्र परिवार आणि नगरसेवक सचिन भाऊ दोडके फुड फाऊंडेशन यांच्या वतीने गोर गरीब जनतेला किराणा मालाचे वाटप केले
ऋषिकेश सुरेश जाधव मित्र परिवार आणि नगरसेवक सचिन भाऊ दोडके फुड फाऊंडेशन यांच्या वतीने गोर गरीब जनतेला किराणा मालाचे वाटप करणे असे मदतकार्य सुरू आहे..आतापर्यंत २००० किलो तांदुळ, तसेच किराणा मालाचे ५०० पॅकेट वडगाव बुद्रुक परिसरातील अल्प उत्पन्न गटातील 500 कुटुंब यांना घरपोच देण्यात आले आहे..यामध्ये तांदुळ, तूरडाळ, तेल, मीठ, साबण, बिस्कीट, इत्यादी वस्तुंचा सामावेश होता. बावधन येथील अनाथ आश्रमात ५०० किलो कांदा व बटाटा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वाटप करता वेळी कोणत्याही नागरिकांचे फोटो काढले जात नाहीत असे ऋषिकेश सुरेश जाधव यांनी सांगितले
या वाटपासाठी श्री. ऋषिकेश दादा जाधव, अभिषेक कवडे, अक्षय शेळके, अमोल शिंदे, अविनाश दिघे, संकेत वेताळ, निखिल संकपाळ, रुपेश भांडीरगे यांचे वाटपासाठी योगदान मिळाले.
https://www.facebook.com/135432326488773/posts/3095845277114115/
जाहिरात