22 एप्रिल रोजी मेघा शर्मा यांचे निधन झाले. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवालसुद्धा निगेटिव्ह होता. जहांगीर हॉस्पिटलच्या पत्रामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की, त्यांना कोरोना नव्हता. निधनाचे कारण तीव्र न्युमोनिया सांगितले आहे. मेघा शर्मा एक गृहीणी होत्या. सोशल मीडियावर त्यांच्या निधनाविषयी अनेक चुकीचे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. मेघा यांच्या विषयी खोट्या पोस्ट न पसरविण्याचे आवाहन शर्मा कुटुंबाने केले आहे.
मेघा यांच्याविषयी खोटी पोस्ट शेयर करणाऱ्यांविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार करत असल्याचे शर्मा यांनी सांगितले आहे. “माझ्या पत्नीच्या फोटोचा गैरवापर करून असत्य दावे केले जात आहेत. जे कोणी असे करेल त्यांच्याविरोधात आम्ही पोलिसांमध्ये तक्रार देणार आहोत. त्यामुळे कोणीही खोट्या पोस्ट शेयर करू नये,” असा इशार त्यांनी दिला.
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेल्या फोटोतील महिलेचे खरे नाव मेघा शर्मा (वय 33) असून, त्या डॉक्टर नाहीत. तसेच त्यांचे निधन कोरोनामुळे झालेले नाही. त्या पुणे येथील एक गृहिणी होत्या.
सोशल मीडियाच्या जमान्यात कोणतीही खातरजमा न करता पोस्ट व्हायरल होणं नवीन नाही. त्यामुळे अनेकांना मनस्तापही झालेला बघायला मिळतो. मात्र त्याचे सत्य समोर आल्यावर सोशल मीडियाच्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.