रुपालीताई चाकणकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत सिंहगड रोड परिसरात घरपोहच जेवणाचे वाटप

धायरी, दि. 8 ( सिंहगड रोड ऑनलाईन ) – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.  कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत कोणतीच यंञणा उपलब्ध होत नसताना आधार सोशल ट्रस्ट(अध्यक्ष: संतोष चाकणकर)व क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठानच्या(अध्यक्ष:रूपाली चाकणकर) वतीने सिंहगड रोड भागातील गरजु व्यक्तींना घरपोच जेवण पोहचविले जात आहे.

सिंहगड रोड परिसरातील अनेक गरीब मजूर कुटुंबे राहतात. या सर्वांचे हातावर पोट आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन झाल्याने हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांचे हाल होत आहेत.गोरगरीब जनता यामध्ये भरडून जाऊ नये यासाठी चाकणकर कुटूंबीयांकडून सामाजिक बांधिलकी जपत गरजू कुटूंबांची उपासमार होऊ नये यासाठी घरपोहच जेवणाचे डब्बे पुरवण्याचे काम सुरू आहे. आधार फाऊंडेशनचे कार्यकर्ते स्वतः पॅकिंग करण्यापासून वाहतुक करण्यापर्यंत काम करीत आहेत. या मध्ये सोशल डिस्टन्स कटाक्षाने पळाला जात आहे. अशा उपक्रमांमुळे राज्य सरकार व प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होईल.

https://www.facebook.com/177300259309608/posts/1075067449532880/



जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.