पुण्यात डोंगराळ भागातील गोरगरीबांना शासनाचा आधार; मिळतय 'शरद भोजन'



शरद भोजन योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या थाळीचा दर प्रत्येकी ५० रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे, गरजूंना दोन वेळेचे जेवण बनवून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येक व्यक्तिनिहाय ५० रुपये प्रमाणे दररोज १०० रुपये दिले जात आहे

पुणे- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे, गोरगरिबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांची जेवणाची चिंता सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेने समाज कल्याण विभागामार्फत 'शरद भोजन' योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार गोरगरिबांना जेवण्याची सोय केली जात आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील आदिवासी, कातकरी, ठाकर समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. लॉकडाऊनमुळे या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र, आता 'शरद भोजन' या जिल्हा परिषदेच्या उपक्रमामुळे डोगराळ प्रदेशात राहणाऱ्या या नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला आहे. तालुक्यातील गावांमधील अंगणवाडी सेविका गावातील निराधार, दिव्यांग, गोरगरीब, गरजूंना रोज दोन वेळेचे जेवण बनवून देत आहे.

शरद भोजन योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या थाळीचा दर प्रत्येकी ५० रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे, गरजूंना दोन वेळेचे जेवण बनवून देणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येक व्यक्तिनिहाय ५० रुपये प्रमाणे दररोज १०० रुपये दिले जात आहे. दरम्यान, या शरद भोजन थाळीचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील निराधार, दिव्यांग व्यक्ती, गरोदर माता, दुर्धर आजार असलेले निराधार व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांची ग्रामपंचायत निहाय पहाणी करून प्रत्येक व्यक्तीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी पोटी झोपणार नाही, यासाठी आम्ही सर्व सदस्य आधिकारी वर्ग काम करत असल्याचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी सांगितले

https://www.facebook.com/135432326488773/posts/3083881858310457/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.