त्यामुळे सर्दी, ताप, खोकला, बी. पी. शुगर, पेशंटची गैरसोय सोय होत आहे परिणामी याचा खूप त्रास होत आहे. अश्या अडचणीच्या काळा मध्ये डॉक्टर त्यांना कोणतीही सेवा घेऊ शकत नाही कारण करोनाच्या संसर्ग जन्य ट्रिटमेंट साठी आवश्यक ती काळजी घेण्यासाठी डॉक्टरांकडे किट उपलब्ध नाहीत. ही गरज ओळखून मोरया मल्टीस्पेसिएलिटी हॉस्पिटल चे संचालक श्री अजित पाटिल यांच्या वतीने आजच्या परिस्थिती जे डॉक्टर्स रुग्णांना अविरत सेवा देत आहेत अश्या सर्व डॉक्टर्स बंधू भगिनींनी Z-Kit भेट देण्यात आले. Z-Kit हे प्रोटेक्शन किट आहे, संसर्गजन्य पेशंट ट्रीट करण्यासाठी हे वापरले जाते
तसेच बाकी जे धायरी वडगांव परिसरातील डॉक्टर आहेत. ज्यांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत त्यांच्या पर्यंत हे किट पोहच केले आहेत जेणेकरून ते क्लिनिक ओपन करतील व पेशंट ची गैरसोय होणार नाही. यावेळी सर्व डॉक्टर्स बंधु भगिनींना आपले क्लिनिक सुरू ठववण्याचे आवाहन डॉ. अजितसिंग पाटील यांनी केले.