पुणे: राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 1943 वर येऊन ठेपली आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. हा आकडा आणखी काही दिवस वाढेल, अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. मात्र, याच परिस्थितीवरुन भाजपने राज्य सरकारवर निशाना साधला.
“गेल्या दीड महिन्यात पालकमंत्र्यांनी पुण्यात येऊन केवळ दोन बैठका घेतल्या आहेत. अधिकाऱ्यांना ते निर्देश देत असतील याची सुतराम शक्यता नाही. अन्यथा अधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशांमध्ये एकवाक्यता दिसली असती. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सात आयएएस अधिकारी नियुक्त आहेत. पण, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या नाहीत. अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे पुणेकरांमध्ये असुरक्षितता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे”, अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली.
“बी. जे. मेडिकल वैद्यकिय महाविद्यालयाच्या (ससून सर्वोपचार रुग्णालय) अधिक्षकांची बदली केल्यानंतर तिथे पूर्णवेळ अधिक्षक नियुक्त केलेला नाही. त्यामुळे अजूनही ससूनमधील कोरोनाच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. उलट परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे”, असं जगदीश मुळीक म्हणाले.
“रेशनिंग दुकानातील शिधावाटप वितरण प्रक्रियेतील गोंधळ वाढला आहे. अजूनही नागरिकांना धान्य उपलब्ध होत नाही. बांधकाम मजूरांना जाहीर केलेले अर्थसहाय्य मिळालेले नाही”, असा दावा जगदीश मुळीक यांनी केला.
“कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जात आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे कोरोनामुळे मृत्यू होण्याची चिंताजनक घटना घडली आहे. दारुची दुकाने खुली केल्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे प्रादूर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे”, असं जगदीश मुळीक म्हणाले.