सिंहगड रोडला दारुच्या दुकांनाबाहेर लाबंच लांब रांगा, चिंतेची बाब

दारूच्या दुकाना समोर तळीरामांची गर्दी
पुणे दि. सिंहगड रस्ता, भागातील कडक संचारबंदीतुन शिथिलता मिळताच दारूचे दुकाने उघडण्यापूर्वीच शेकडो तळीरामांनी गर्दी केली, रस्त्यावर गाड्यांची गर्दी झाल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत आहे. यामुळे लाॅकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाल्याचेच स्पष्ट झाले आहे.

या दुकानासमोर २००-३०० जणांची रांग असल्याने अनेक वाईन शाॅप मालकांची  गर्दी कमी होणाची वाट पाहात दुकान उघडले नाही. मात्र  दुकानासमोरील रांग कमी होण्याऐवजी वाढतच गेली. तसेच देशी दारूच्या दुकानासमोर ही अशीच गर्दी होती.

गेले काही दिवस किराणा दुकान, चिकन-मटणाच्या दुकानासमोर सोशल डिस्टंन्स ठेवून रांगा लागत होत्या, मात्र आज दारूच्या दुकानासमोरच शेकडो लोक उभे असल्याने हा चर्चेता विषय ठरला. या गर्दी व रांगांचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यावेळी दारू एवढी अत्यावश्यक वस्तू आहे का अशीच चर्चा रंगली. दरम्यान, शहरात काहा पेट्रोल पंपावरही नागरिकांना रांगा , तेथेही सोशल डिस्टंन्सींगच्या नियमांचे पालन झाले नाही. सिंहगड रस्ता भागात पोलिसांनी जबरदस्तीने दुकाने बंद करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.