शंकरशेठ जगताप यांच्या सहकार्याने ललित म्हसेकर पुरवत आहेत घरपोहच भाजीपाला


नवी सांगावी दि.१० (सिंहगड टाईम्स) करोना प्रादुर्भावामुळे लागलेला लॉकडाउन आता हळूहळू संपले आहे. परंतु व्हायरसशी संसर्ग झालेल्या लोकांची संख्या अजूनही वाढत आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिक बाहेर पडून रस्त्यावर गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी नवी सांगावी येथे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक मा श्री शंकरशेठ जगताप यांच्या पुढाकाराने भाजपा यु मो विद्यार्थी आघाडी चिंचवड विधानसभा अध्यक्ष ललित म्हसेकर हे शेतकरी ते ग्राहक असा ताजा भाजीपाला ना नफा ना तोटा या तत्वावर घरपोहच उपलब्ध करून देत आहेत.


"प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूची खरेदी विक्री करण्यासाठी ठराविक वेळ दिला आहे, त्यामुळे रस्त्यावर गर्दी होत असून सोशल डिस्टन्स पळाला जात नाही हे लक्षात घेऊन तसेच ग्राहकांचा करोना संसर्गापासून बचाव व्हावा याचा विचार करून ना नफा ना तोटा या तत्वावर घरपोहच भाजीपाला पोहचवण्याचा उपक्रम राबवत आहोत तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा". असे माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी सांगितले.

ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकरी शेतकऱ्याच्या शेतातून डायरेक्ट    ग्राहकाला घर पोहच भाजी पोहच करण्याचा उपक्रम चालू असून रोज ८० ते १०० ग्राहक भाजी मागवत आहेत, खालील मोबाईल नंबर वरती  ऑर्डर केल्यानंतर आपल्याला दुसर्‍या दिवशी भाजीपाला घरपोच दिला जात आहे, या मध्ये स्वच्छता आणि सुरक्षितता यांची काटेकोरपणे काळजी घेण्यात येत असून भाजी पोहच करनाऱ्या प्रतिनिधींना हॅन्डग्लोज, मास्क पुरवले आहे. यावेळी "भाजी खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी न करता या नंबर ७७६८०१४१४० / ९०२८२८६८२८ वर कॉल करून भाजीपाला घरपोहच मागववा" असे आवाहन ललीत म्हसेकर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.