माजी आमदार बाळा भेगडे यांच्या वतीने वाशिमच्या मजुरांना घराकडे रवाना करण्यात आले.

मावळ दि. ११ (सिंहगड टाईम्स) करोना प्रादुर्भावामुळे देशभर घोषित केलेला लॉकडाऊन हळू हळू कमी होत आहे, परंतु रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक आहे, मावळ तालुक्यात बाहेरून काम धंद्याच्या शोधत अनेक गोर गरीब, मजूर कुटुंब राहण्यासाठी असून लॉकडॉउन मुले त्यांच्या हाताला काम राहिले नसल्याने त्यांच्यावर जगावं कसं हा प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे मजूर आपल्या मूळ गावाकडे जाण्याचा प्रयन्त करूनही लॉकडाऊन मुळे त्यांना जाता येत नव्हते, शासनाच्या नव्या आदेशानुसार माजी आमदार बाळा भेगडे यांनी वाशिम च्या मजुरांची त्यांच्या मूळ गावी जाण्याची सोय केली.

    भारतीय जनता पार्टी मावळ तालुका व मा.कामगार राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांच्या माध्यमातून मावळ तालुक्यात अडकलेल्या मजुरांना वाशीम येथे आपल्या घराकडे जाण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात आली, यामध्ये सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी पूर्ण करून त्याचबरोबर त्यांना प्रवासात जेवणाचे पॅकेट,पाणी,मास्क चे वाटप करून सर्व कामगारांना त्यांच्या घराकडे रवाना करण्यात आले. गोर गरीब मजुरांकडून  बाळा भेगडे यांचे आभार मानले . या वेळी मा.तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुकाध्यक्ष रवींद्रपअप्पा भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,अलकाताई धानीवले, युवाध्य्क्ष संदीप काकडे, संघटनमंत्री किरण राक्षे,सायली ताई बोत्रे,आदी उपस्थित होते. Sinhagad Times

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.