एकूण ८२ रक्तदात्यांनी केले रक्त दान
शहरात अनेक ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याच्या अनुषंगाने शिबिराचे आयोजन
पुणे, दि.२० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागा व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी डॉक्टर सेल(डॉक्टर नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शना खाली)आणि मोरया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास कलाकारांनी चांगला प्रतिसाद दिला.बालगंधर्व रंगमंदिर,शिवाजीनगर पुणे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कोरोना सारख्या संकट प्रसंगी देखील ८२ कलाकारांनी येऊन एवढ्या संख्येने रक्तदान केले, या शिबिरात मोरया हॉस्पिटल चे डॉ अजितसिंह पाटील आणि भारती हॉस्पिटल ची ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्व नियमांचे पालन करून योग्य तपासणी करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अनेक कलाकार मंडळी उपक्रमास उपस्थित न राहता आल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली. काही कलाकार ज्यांना आज या ठिकाणी येता आले नाही ते कलाकार भारती हॉस्पिटल येथे जाऊन रक्तदान करणार असल्याचे प्रमोद रणवरे यांनी सांगितले.या अशा समाज उपयोगी उपक्रमास सर्वांनी शुभेच्छा दिल्या व नंतर देखील काही दिवसांनी पुन्हा एकदा शिबिराचे आयोजन करावे असे मत कलाकारांनी व्यक्त केले.
यावेळी अभिनेते सिध्देश्वर झाडबुके, चेतन छावडा,लावणी सम्राज्ञी वनमाला बागुल, स्वाती धोकटे, अभिनेत्री माधवी मोरे, हसीना मंडल, ज्येष्ठ कलाकार माणिक भाई बजाज व प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष प्रमोद रणवरे, बालगंधर्व शाखा अध्यक्ष दिनेश भोसले, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख अमित कुचेकर, सरचिटणीस मनोज माझीरे,अरुण गायकवाड विनोद धोकटे व सर्व कलाकार, पदाधिकारी उपस्थित होते.