पुणे महानगर पालिका कोरोना चाचणीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लॅब बस

Corona test, Sinhagad Times
पुणे, (Sinhagad Times)प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या जास्तीत जास्त प्रमाणात तपासण्या करण्यासाठी पुणे मनपा व क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटर प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना चाचणी साठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज वातानुकूलित लॅब बस शहरात उपलब्ध करण्यात आली आहे. या लॅबमध्ये एक्स-रे मशीन, स्वॅब संकलन, पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे लवकरात लवकर रुग्णाचे निदान होण्यास मदत होणार आहे. बुधवार दि.२० मे २०२० रोजी या बस चा लोकार्पण सोहळा मा.महापौर यांच्या हस्ते संपन्न झाला.या  लॅब बसद्वारे बाधीत क्षेत्रात घरोघरी जाऊन नागरिकांची स्क्रिनिंगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.



यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,महापालिका अतिरिक्त आयुक्त (जनरल) रुबल अग्रवाल,महापालिका अतिरिक्त आयुक्त (विशेष) शान्तनू गोयल , स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, सभागृह नेते धीरज घाटे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, कार्यकारी उपाध्यक्ष अनिल साळुंखे, पालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य प्रमुख डॉ अंजली साबणे, डॉ वैशाली जाधव, पालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.