Sinhagad Times मावळ तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी यंदाच्या ईदला मशिदीऐवजी घरातच नमाज पठण करावे,'असे आवाहन मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे सहकारी साजिद शेख यांनी केले आहे.तळेगाव स्टेशन मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष अयुबभाई शिकीलकर व जामा मस्जिद चे विश्वस्त रशिदभाई सिकीलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ईद-उल-फित्रची नमाज आपण आपल्या घरीच पठण करुन येणारी रमजान ईद समाजातील गरीब गरजु लोकांना मदत करुन साजरी करण्याचे आवाहन साजिद शेख यांनी सर्व मुस्लिम बांधवांना केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले 'लॉकडाउन' आणि करोना संसर्ग वाढण्याचा धोका या पार्श्वभूमीवर हा फतवा काढण्यात आला आहे लॉकडाउन'च्या चौथ्या टप्प्यात काही बाबतीत शिथिलता असली, तरी धार्मिक कार्यक्रम आणि इतर कारणाने एकत्र येण्यावर बंदी कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर ईदलाही मशिदीऐवजी घरीच नमाज पठण करावे,असे आवाहन साजिद शेख यांनी केले आहे.