भारतीय शेतकऱ्यांवर विनाशकारी टोळधाडीचे संकट


हवामान बदलामुळे यंदा विनाशकारी टोळधाड आल्याचा दावा पर्यावरणतज्ज्ञांनी केला आहे. ही अडीच दशकांमधील सर्वांत मोठी आणि विनाशकारी टोळधाड असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. ‘क्लायमेट ट्रेंडस्’च्या मुख्य प्रशासकीय अधिकारी आरती खोसला यांनी सांगितले की, हवामान बदलामुळे पाच महिन्यांपूर्वी पूर्व आफ्रिकेत प्रचंड पाऊस पडला होता. त्यामुळे उपयुक्त वातावरण निर्माण होऊन टोळांचे थवे विकसित झाले. आरती खोसला यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची खाद्य संघटना ‘एफएओ’नुसार जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर टोळधाडीचा हल्ला तीव्र होईल. भारतीय शेतकऱ्याना टोळधाडीच्या संकटाचा सामना करावा लागेल.

कृषी आयुक्त ओम प्रकाश यांनी सांगितले की, श्रीगंगानगर जिल्ह्यात ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. नागौरमध्ये १०० हेक्टरील पिके टोळांनी फस्त केली. राज्यातील २० जिल्ह्यांतील ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ६७ हजार हेक्टरवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. ब्रिटिश निर्मित ८०० फवारणी यंत्रांच्या ट्रॅक्टरांद्वारे ही फवारणी करण्यात आली. या कामी २०० पथके लावण्यात आली. १२० जीप उपलब्ध करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांना कीटकनाशके मोफत उपलब्ध करून देण्यात आली.

टोळधाड ताशी १५ ते २० कि.मी. वेगाने प्रवास करून एका दिवसात १५० कि.मी.चे अंतर पार करते. शेतावर पिके कमी असल्यामुळे टोळ सध्या झाडे आणि अन्य खाद्यपदार्थांना लक्ष्य बनवीत आहेत. पिकांची अनुपलब्धता असल्यामुळेच टोळ पाकिस्तानातून इतके अंतर पार करून भारताच्या विविध राज्यांत शिरले आहेत.

मध्यप्रदेशातील मालवा भागात टोळधाड आल्या आहेत. च्महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि मध्यप्रदेश या पाच राज्यातील शेतकऱ्यांना टोळधाडीमुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, कृषि मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, या राज्यांमध्ये टोळ नियंत्रण अभियान सुरु करण्यात येत आहे.

राजस्थानातील बारमेर, जोधपूर, नागौर, गंगानगर, हनुमानगड, जयपूर जिल्ह्यात तसेच मध्यप्रदेशातील सतना, ग्वाल्हेर, राजगड, बैतुल, देवास, आगर मालवा जिल्ह्यात टोळ सक्रीय आहेत. महाराष्ट्रात काही भागात किटकनाशकांची फवारणी करण्यात आली आहे. नागपूर, भंडारा या भागात टोळधाड आगेकूच करत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्याच्या कृषि विभागाने विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांसाठी याचा इशारा जारी केला आहे. Attack of Locusts

                                         जाहिरात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.