सिंहगड रोड – कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत आपली सामाजिक बांधिलकी जपत बिलाल मस्जिद ट्रस्टचे हाजी नूर मोहम्मद सय्यद आपल्या परीने गरजू गोरगरिबांना मदत करून हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना रुजवत आहेत
कोरोना सारख्या महामारीत देशभर गरजूंना मदत करण्याचे आव्हान केले जात आहे अशावेळी कोणत्याही प्रसिद्धीची लालसा न करता, स्वतःच्या तब्येतीची काळजी न करता, कोणाकडूनही कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता बिलाल मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी नूर मोहम्मद सय्यद यांनी आत्ता पर्यंत गरजूंना ७३० रेशनिंग किटचे वाटप केले आहे, हवेली पोलिस स्टेशनला सॅनिटायझर संच उभारून दिला आहे, धायरीतील राष्ट्रसेवा समूह अन्नदानाला १०० किलो तांदूळ व तेलाचा डबा देऊन समाज कार्यात सहभागी झाले आहेत, रमजानच्या पहिल्या लॉकडाऊनमुळे बऱ्याच मुस्लिम बांधवाना बाहेर पडता आले नाही त्यांना ५०० खजूर पाकिटांचे वाटप केले, गरजू गोरगरिबांना मोफत ४५०० अंड्याचे वाटप करत आहेत
या वेळी रमजानमध्ये वायफळ खर्च न करता, ईफतार पार्टी वर खर्च न करता, कपडे खरेदी न करता गरिबांना मदत करावी असे मुस्लिम बांधवाना त्यांनी आवाहन केले.