आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने संत गाडगे बाबा वस्ती येथील ७०० गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

शोभा आर. धारिवाल, आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल, पुनीत बालन
पुणे, दि.४ (सिंहगड टाईम्स) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा मोठा फटका विविध क्षेत्रात रोजंदारीवर असलेल्या कामगारांच्या जीवनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या वतीने कोरेगाव पार्क भागातील संत गाडगे बाबा वस्तीतील ७०० गरजू कुटुंबांना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या उपाध्यक्षा शोभा आर. धारिवाल, आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, एसीपी रवींद्र रसाळ, पोलिस निरीक्षक गणेश माने, नगरसेवक उमेश गायकवाड, नगरसेविका मंगला मंत्री आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना शोभा आर. धारिवाल म्हणाल्या, विविध सामाजिक कार्यात  आर. एम. धारिवाल फाउंडेशन नेहमीच सक्रिय सहभागी होत असत, देशावर आलेल्या संकटकाळात गरजूंच्या मदतीला धावणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानत आलो आहोत. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर आम्ही लक्ष्य केंद्रीत केलेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आज केलेली मदत ही शेजारधर्म म्हणून केलेली आहे. संत गाडगे बाबा वसाहत मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढळलेली स्वच्छता प्रशंसनीय आहे. कोरोना लवकर जावा आणि आपल्याला लागलेली स्वच्छतेची सवय कायम रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.