मला कसलाही आजार नाही, मी ठणठणीत - अमित शाह


Sinhagad Times

गेल्या २-३ दिवसांपासून सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. आता स्वतः अमित शाह यांनी ट्विट करत आपण ठणठणीत असल्याचं म्हटलंय.

फेसबुक, ट्विटरवर अमित शाह यांना हाडाचा कॅन्सर झाला असल्याच्या अनेक पोस्ट्स व्हायरल आहेत. यासोबत एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा एका व्हिडीओ कॉन्फरन्समधला एक फोटोही व्हायरल केला जातोय. या फोटोत अमित शाह यांची प्रकृती ढासळली असल्याचं सांगण्यात येत होतं.

या सर्वांचं अमित शाह यांनी खंडण केलंय. ‘काही लोकांनी माझ्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या आहेत. अनेकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना पण केल्या. मी देशाचा गृहमंत्री या नात्याने कोरोनाच्या या काळात कामात व्यस्त आहे, म्हणून या अफवांकडे मी दुर्लक्ष केलं

पण पक्षाच्या लाखो कार्यकर्त्या आणि शुभचिंतकांनीही माझ्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. त्यांना मला सांगायचं आहे की, मी पूर्णपणे सदृढ आहे, मला कसलाही आजार झालेला नाही.’ असं अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलय.


 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह - ट्विटर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.