पीएम केअर्स फंडाचा हिशोब जनतेला द्या – राहूल गांधींची सरकारकडे मागणी

८ मे: कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीतून सावरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्स फंडासंदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. पीएम केअर्स फंडाचा हिशोब जनतेला द्या. अशी मागणी त्यांनी केली आहे.

पीएम केअर्समधील निधीचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. पीएम केअर्स फंडमध्ये किती पैसे जमा झाला आणि त्याचा खर्च कशापद्धतीने केला याचा हिशोब सरकारने जनतेला दिला पाहिजे, असे म्हणत राहुल गांधी यांनी कोरोना मदत निधीसंदर्भातील व्यवहारात पारदर्शकता दाखवा, असा अप्रत्यक्ष टोलाच मोदी सरकारला लगावला आहे.

देशातील कोरोनाजन्य परिस्थितीच्या संदर्भात शुक्रवारी राहुल गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मजदूरांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात मोदी सरकार घाबरत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. प्रत्येक मजूराच्या खात्यात पैसे टाकणे यात जोखीम निश्चित आहे. पण सद्यपरिस्थितीत ही जोखीम घ्यावीच लागेल, असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिलाय. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकार जेवढा वेळ विचार करेल तेवढा वेळ निर्रथकच ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.