उद्या दि. ८ मे रोजी करोना पार्श्वभूमीवर सिंहगड रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सिंहगड रोड दि.७ : सध्या करोना विषाणूच्या प्रदुभवामुळे अनेक गोष्टींवर जसा परिणाम झाला आहे तसाच रक्तदानावरही खूपच परिणाम झाला आहे. विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तसेच प्रसन्नदादा जगताप मित्रपरिवार, चंद्रशेखर यादव सर आणि राम बांगड आणि रक्ताचे नाते ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने उद्या दि. ८ मे रोजी करोना पार्श्वभूमीवर अनुश्री हॉल, माणिकबाग, सिंहगड रोड  येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत छोट्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

करोना प्रादुर्भावामुळे एकत्रितपणे मोठी रक्तदान-शिबिरे घेण्यात अडचणी येत आहेत आणि लॉकडाऊन असल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांत रोज होणारी ऑपरेशन्स आणि गंभीर आजारांसाठी रुग्णांना रक्त तर लागणारच ... मग हा प्रश्न सोडवायचा कसा ? या दृष्टीने व्यापक विचार करून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, असे प्रसन्न दादा जगताप यांनी सांगितले.

रक्तदानाने कोरोना होत नाही, पण रुग्णाचे प्राण वाचण्यास निश्चितच मदत होऊ शकते. तरी जास्तीत जास्त लोकांनी येऊन रक्तदान करावे. थंडी,ताप,सर्दी,खोकला झालेल्या व्यक्तींनी रक्तदानाला येवू नये.छोट्या गटामध्ये येवून रक्तदान करून आपण एक सामाजिक जबाबदारी पार पाडावी, गटाने येताना वेळ घेवूनच या म्हणजे आपला वेळ वाचेल आणि गर्दीही होणार नाही. ज्यांना कोणाला रक्तदान करावयाचे आहे त्यांनी खलील फोन करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने केले आहे.

थंडी,ताप,सर्दी,खोकला झालेल्या व्यक्तींनी रक्तदानाला येवू नये.

 विश्व हिंदू परिषद बजरंग दल,
केतन घोडके 9921111116
अँड. प्रसन्नदादा घ. जगताप
मा. उपमहापौर व विद्यमान नगरसेवक
संपर्क - 9822022950
श्री. चंद्रशेखर शंकर यादव
संपर्क - 9881736112
श्री. राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट*
संपर्क - 9422085924
श्री. समीर रुपदे
आपुलकी, पुणे
संपर्क - 9850567475
श्री. सचिन कळंबे
संपर्क - 9423522525



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.