पुणे दि. १५ (Sinhagad Times) कोरोनाबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर कोणतीही धोरणात्मक ‘पॉलिसी’ अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. या महामारीबाबत देशात कसलीही सुसूत्रता येत नाही. केंद्र सरकार निश्चित धोरण ठरविण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी (दि. १५) केला आहे.
खासदार कोल्हे यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वॉर रुमला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
ते म्हणाले, “देशभरात स्थलांतरीत कामगारांच्या आजच्या स्थितीला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे. ३० दिवस सतत सूचना बदलत होत्या. सातत्य नसल्यामुळे कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. त्यातूनच अनेक चुकीच्या घटना घडल्या. केंद्राने राज्य शासनांबरोबर योग्य समन्वय साधून लॉकडाऊनमधून लवकर बाहेर पडण्याची गरज आहे.
दुकाने, उद्योग सुरू करण्यासाठी भीती आहे. परंतु, अर्थव्यवस्था सुरू करणे गरजेचे आहे. योग्य ती काळजी घेऊनच पावले उचलावी लागतील. संसर्ग वाढणार नाही, यासाठी दक्षता घ्यावी. चित्रपट, सिनेसृष्टीला खूप मोठा फटका बसला आहे. सरकार आजही या क्षेत्राकडे व्यावसायिक पद्धतीने पाहत नाही. या क्षेत्राला उभारी देणे आवश्यक आहे.
कोरोना संकटात पिंपरी-चिंचवड महापालिकेने चांगले नियोजन केले. शहरातील नागरिकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना सहकार्य करत कोरोना विरोधात दिलेला लढा कौतुकास्पद आहे. शहरात कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. महापालिका लवकरच मोबाईल टेस्टिंग व्हॅन सुरू करून शहरातील नागरिकांना दिलासा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.”