महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच असा विरोधी पक्ष आहे, जो महाराष्ट्राची बाजूच घेत नाही- संजय राऊत

मुंबई : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र केंद्र गांधीनगर हलवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावरुन राजकारण तापलं आहे. आता  शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर मत व्यक्त केलं आहे.

“महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांची लोक आहेत, त्यांचं असं बोलणं आश्चर्यकारक आहे. खरं तर अशा प्रश्नावर विरोधी पक्षाला सरकारला धारेवर धरण्याची संधी असते. पण, या सगळ्या प्रकरणाशी उद्धव ठाकरे यांचा काहीही संबंध नाही. कारण ते आता सत्तेत आले आहेत, असं राऊत म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र मुख्यमंत्र्यांनी जाऊ कसं दिलं? पण इथं वेगळंच आहे. राज्याच्या इतिहासात मला प्रथमच असा विरोधी पक्ष दिसतोय, जो कुठल्याही प्रश्नावर महाराष्ट्राची बाजूच घेत नाहीये. तो महाराष्ट्राच्या विरोधात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या नेत्यांची बाजू घेत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, जर हा महाराष्ट्रावर अन्याय आहे, असं कोणाला वाटत नसेल, तर तुम्ही या महाराष्ट्राचं राजकारण करण्यास नालायक आहात, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर तोफ डागली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.