खडकवासला दि.२३ आज हवेली पोलिसचे निरीक्षक श्री.शेळके साहेब व पोलिस कर्मचारी बाबर साहेब ह्यांच्या उपस्थितीत बिलाल मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष हाजी नूर मोहम्मद सय्यद, तनवीर शेख व इतर सदस्यांन समवेत येणाऱ्या रमजान ईद च्या पार्श्वभूमीवर मीटिंग घेण्यात आली. या मीटिंग मध्ये नांदेड ते गोऱ्हे दरम्यानच्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदची नमाज व इतर धार्मिक विधी घरीच राहून पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली.
रमजान ईद सण साजरा करताना सोशल डिस्टन्सचे काटेकोरपणे पाळावे. नमाज नंतर एकमेकांना भेटणे टाळावे व शक्यतो गळाभेट न करता सोशल डीस्टनसिंगचे नियम पाळून लांबूनच सलाम दुवा करण्याचे आव्हान करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता धार्मिक स्थळे बंद असल्या कारणाने मुस्लिम समाजा तर्फे स्वतःहून मस्जिद बंद ठेवण्यात याव्यात अशी मागणी केली जात होती त्यास अनुसरून प्रशासनाने ही तशाच सूचना सर्व जनतेला दिल्या आहेत.
रमजान ईदच्या खरेदी साठी घराबाहेर न पडता साध्या पद्धतीने ईद साजरी केली जावी अशी विनंती राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष तनवीर शेख यांच्या तर्फे करण्यात आली. वायफळ खर्च टाळत त्या पैशाचा उपयोग गरजूंना मदत म्हणून करावा असे आव्हान मस्जिद चे उपाध्यक्ष दादा भाई शेख व जब्बार भाई शेख यांनी केले. शेवटी अल्लाह कडे कोरोना मुक्ती साठी दुवा करत मीटिंगची सांगता करण्यात आली.