विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोथरुड मतदारसंघाच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होती . हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझा पहिला अधिकार होता, कारण मला अनेक वेळा प्रॉमिस केलं होतं. माझं नेमकं काय चुकलं हे पक्षाने सांगावं. माझं काय चुकलं हे मला माहीत नाही, आता मला काही पुन्हा संधी दिसत नाही असं सांगताना मेधा कुलकर्णीच्या डोळ्यात आलं पाणी.
मला तिकीट दिलं नव्हतं. मी पडलेली नव्हते, तर आश्वासन देऊन मला थांबवलं होतं. मी पक्षाची पंचवीस वर्षापासून कार्यकर्ती आहे. पक्ष कुठेच नसताना मी निष्ठेनं काम केलेला आहे. वेगवेगळी प्रलोभने आली असतानाही मी पक्ष सोडला नाही. अत्यंत कठीण, वाईट परिस्थितीत पक्षाला मी विजय मिळवून दिला आहे, मला पक्षांवर दबाव आणता येत नाही, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी केली
चंद्रकांत पाटील-देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमी माझी चर्चा होत होती, आजही सर्व नेत्यांना मेसेज केले मात्र कोणाचाच रिप्लाय आला नाही, असं सांगताना कुलकर्णी यांना रडू कोसळले.