समिर पायगुडे यांच्या वतीने ३५० हून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


    कुडजे गावकऱ्यांनी केले पुष्पवृष्टीने पोलिसांचे स्वागत
    वाढदिवासाचा खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी
पुणे (सिंहगड टाईम्स)– कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आपला वाढदिवस साजरा न करता गावातील ३५० हून अधिक गरजू कुटुंबांना किराणा सामान व जीवनश्याक वस्तूंच्या किट देऊन कुडजे गावचे माजी सरपंच समीर रवींद्र पायगुडे यांनी सामाजिक भान दाखवले आहे. तसेच कोरोनाच्या महामारीत नागरिकांची उत्तम काळजी घेणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पो. नि.  सुनील पंधरकर, पोलिस उपनिरीक्षक ढेगले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी सरपंच सुरेश आण्णा गुजरसरपंच अश्विनी पायगुडेज्ञानेश्वर पायगुडे, उपसरपंच सीमा पायगुडे. प्रियंका पायगुडेभिकोबा पायगुडेचेअरमन रवीद्र पायगुडे, पिंटू पायगुडेमाउली पायगुडेसुरेश पायगुडेसुनील खिरीडअशोक पायगुडे, दशरथ घुमेग्रा.प. सदस्य प्राजक्ता लोणारेनवनाथ निढाळकर, दत्तात्रय पायगुडे (पो.पाटिल ) राकेश पायगुडे,विलास पायगुडेगौरव पायगुडेअजित पायगुडे, संदिप गायकवाड मिलिंद गायकवाड ,सुनील पायगुडे ,दत्तात्रय मारणे,सुनील मारणे, राजेंद्र पायगुडे यांचे सहकार्य लाभले.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.