पार्थ दादा पवार फाऊंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांना मास्क व सॅनिटीझर वाटप


कोविड-19 कोरोना वायरस चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे संपूर्ण जगात करोना वायरस थैमान सुरू आहे, याला रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात आला आणि याच काळात पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून सर्व सामान्य जनतेपर्यंत बातम्या पोहचवण्याच काम करत आहेत त्यांना कोरोना पासून स्वतःचा बचाव करता यावा यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते मा.पार्थ दादा पवार फाऊंडेशन तर्फे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकारांनां सानिटायझर व मास्क च वाटप करण्यात आले.

लॉकडाउन आता हळूहळू संपले आहे. परंतु व्हायरसशी संसर्ग झालेल्या लोकांची संख्या अजूनही वाढत आहे. पत्रकार बातमी साठी फिल्ड वरती काम करत आहेत, बातमीसाठी त्यांना अनेक लोकांच्या संपर्कात यावे लागते अश्या वेळी त्यांचा करोना पासून बचाव व्हावा म्हणून पत्रकारांना मास्क व सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात येत आहे, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिं. चिं. शहराध्यक्ष मा. श्री. विशाल वाकडकर यांनी सांगितले, यावेळी राष्ट्रवादी युवा काँग्रेस संघटक महाराष्ट्र राज्य  मा. श्री. विशाल काळभोर, नवनाथ वाळुंजकर, मयूर जाधव, प्रतीक साळुंखे, अशोक भडकुंभे, अक्षय माचरे, पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.