भवानी पेठेच्या कंटेन्मेंट भागात राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलचे तपासणी शिबीर

                                                                                               
Bhawani Peth, Corona,


राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या 'डॉक्टर्स आपल्या दारी' अभियानाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रारंभ

पुणे, दि.१५ Sinhagad Times : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांच्या मदतीला आजपासून राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे 'डॉक्टर्स आपल्या दारी' हे अभियान सुरु झाले. या अभियानाद्वारे पुणे शहराच्या कंटेनमेंट वैद्यकीय मदत शिबिरे आयोजित केली जात आहेत. आज (शुक्रवारी ) दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पबचत भवन येथे अभियानाचा अनौपचारिक प्रारंभ केला. या अभियानात एकूण १५० डॉक्टर्स मंडळींनी सहभाग नोंदविल्याची  माहिती राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप यांनी दिली. एक महिना हे अभियान चालणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल आणि पुणे महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी अभियान भवानी पेठ भागात लोहियानगर,फायर ब्रिगेड जवळ तसेच  सावधान मंडळ ( गंजपेठ, चंदन स्वीटमार्ट जवळ) येथे  दुपारी १२ ते ५ या वेळेत घेण्यात आले. २ रुग्ण वाहिकांसह १५ डॉक्टर्स सहभागी झाले. ५५० जणांची तपासणी करण्यात आली आणि औषधोपचार करण्यात आले. डॉ राजेश पवार , डॉ संगीता खेनट, डॉ राहुल सूर्यवंशी, डॉ तुषार वाघ, डॉ.सिद्धार्थ जाधव, डॉ. मोहन ओसवाल, डॉ नितीन पाटील, डॉ सचिन लोंढे, डॉ कपिल जगताप आदींनी सहभाग घेतला.

यावेळी आमदार चेतन तुपे, विनायक हनमघर, गणेश नलावडे, बाबा धुमाळ, सुहास ऊभे यांनी 'राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या 'डॉक्टर्स आपल्या दारी' अभियानाला शुभेच्छा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.