लॉकडाऊनमुळे अडकलात?, ट्रॅव्हल पास साठी इथे नाव नोंदवा. काय अटी आहेत? जाणून घ्या.


lockdown travel permit
lockdown traveling pass
lockdown travel form

पुणे दि.२ दुसऱ्या टप्प्यातली लॉकडाऊनची मुदत 3 मेला संपणार होती. मात्र ती पुन्हा 17 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला 4 मे पासून सुरूवात होणार आहे. 4 मे ते 17 मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन असणार आहे.  आता पुणे विभागात अडकून पडलेल्या लोकांसाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी माहिती दिली आहे. घाबरून न जाण्याचे  तसेच सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

लॉक डाऊन मध्ये अडकून पडलेल्या लोकांसाठी सरकारने नवीन धोरण तयार केले आहे. यासाठी आपणास खलील http://covid19.mhpolice.in वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरावा लागणार आहे, अर्जामध्ये असलेल्या तपशिलाचा पूर्तता झाल्या वर तो योग्य व पात्र असेल तरच त्याला प्राधान्य देण्यात येईल. नंतर तो अर्ज तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये जाणार आहेत त्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिस ला तो पाठवला जाईल तिकडून जर तुमच्या अर्जाला परवानगी मिळाली तरच आपण जाऊ शकता, अन्यथा आपणास परवानगी दिली जाणार नाही, जर आपला अर्ज मान्य झाला तर आपणास मेडिकल सर्टिफिकेट त्या बरोबर जोडावे लागेल.

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिलेली माहिती



ई ट्रॅव्हल पास साठी लिंक https://covid19.mhpolice.in

प्रवासासाठी लागणाऱ्या प्रवासी वाहनाची सोय आपल्या स्वतःला करावयाची आहे, त्याचाही तपशील द्यावा लागणार आहे

आपण अर्ज केला की लगेच परवानगी भेटलं अस नाही

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.