जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करत भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करत भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आणि पराराष्टमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून 3 कोटी रुपयांच्या आसपास निधी मिळाला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार अजित डोवाल यांच्या संस्थेचे 9 चीनी संस्थांशी जवळून संबंध असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. एकीकडे आपण चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करतो, त्यासंदर्भात जनजागृतीसाठी आंदोलने करतो. विशेष म्हणजे अनेक दिग्गजांनी आणि भाजापा नेत्यांनीही चीनी मालावर बहिष्कार करण्याचे आवाहन केलंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही चायना मालावर बहिष्कार करण्याचे सूचवत, सैन्य दलाच्या कँटींनमध्ये केवळ स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याचे आदेशच दिले आहेत. मात्र, भाजपा नेत्यांच्या दुटप्पीपणा यातून दिसून येत आहे.https://twitter.com/Awhadspeaks/status/1277247943708475393?s=20
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करत भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आणि पराराष्टमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून 3 कोटी रुपयांच्या आसपास निधी मिळाला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार अजित डोवाल यांच्या संस्थेचे 9 चीनी संस्थांशी जवळून संबंध असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. एकीकडे आपण चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करतो, त्यासंदर्भात जनजागृतीसाठी आंदोलने करतो. विशेष म्हणजे अनेक दिग्गजांनी आणि भाजापा नेत्यांनीही चीनी मालावर बहिष्कार करण्याचे आवाहन केलंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही चायना मालावर बहिष्कार करण्याचे सूचवत, सैन्य दलाच्या कँटींनमध्ये केवळ स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याचे आदेशच दिले आहेत. मात्र, भाजपा नेत्यांच्या दुटप्पीपणा यातून दिसून येत आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या दोन नेत्यांच्या आणि संस्थांचा दाखल देतच, भाजपावर निशाणा साधला आहे. विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!, असे म्हणत भाजपावर टीका केली आहे.