आमदार संग्रामदादा थोपटे यांनी सादर केला निसर्ग वादळ आपत्तीचा अहवाल

Amdar-Sangramdada-Thopate
विशाल भालेराव 
भोर वेल्हा मुळशी तीनही तालुके तसे भौगोलिक दृष्ट्या विस्तारित आणि डोंगर माथ्याचे 3 जून रोजी झालेल्या निसर्ग चक्री वादळाचा फटका तीन तालुक्यातील बहुतांशी भागाला बसला, त्या पार्श्वभूमीवर भोर वेल्हा मुळशी चे कार्यक्षम आमदार श्री संग्रामदादा थोपटे यांनी दि. १७  रोजी राज्याचे मदत व  पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा नामदार विजयजी वडेट्टीवार यांची समक्ष भेट घेऊन सदरच्या पुढील घटनांचा आढावा सादर केला

शेतकऱ्यांचे घराचे, पॉलिहाऊस व शेडनेट,भाजीपाला, फळपिके, मयत जनावरे, बाधीत गोठे, झोपडपट्ट्यांचे नुकसान, जिल्हापरिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडया, महावितरण चे पोल, मयत व जखमी व्यक्ती, इत्यादींना रीतसर पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाई तातडीने मिळावी अशी मागणी केली, झालेल्या बैठकीत झालेल्या प्रचंड नुकसानीबाबत शासन निर्णयानुसार लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन मंत्री महोदयांनी आमदार संग्रामदादा थोपटे यांना दिले व तातडीने प्रस्ताव सादर करून संबंधितांना योग्य ती मदत करण्यात येईल असे सांगितले व तशा सूचना मा.विभागीय आयुक्त, पुणे विभाग, पुणे व मा.जिल्हाधिकारी, पुणे याना देण्यात आल्या त्याचप्रमाणे मौजे कोंढरी गावचे पुनर्वसन करण्याकामी तात्काळ पुढील कार्यवाही करण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.