विशाल भालेराव
धायरी येथे मंडप व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच धायरी येथे आणखी एक आत्महत्येचा प्रकार समोर आला आहे. प्रेमनाथ शेट्टी (वय 43) असे आत्महत्या केलेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव असून याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शेट्टी यांनी हॉटेल भाड्याने घेतलं असून ते या हॉटेलचे मॅनेजर होते. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, मानसिक नैराश्य आणि लॉकडाऊनमुळे आलेला तणाव यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शेट्टी हे धायरी परिसरात हॉटेल व्यवसाय करत होते. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे हॉटेल व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे व्यवसायिक संकट आणि आर्थिक अडचणीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सकाळी हॉटेलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहे.