'पडळकर' माफी मागा नाहीतर पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवती कडून चपलांचा हार घालण्यात येईल - अश्विनी खाडे

महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांना केवळ राजकारण करायचे आहे. आजपर्यंत अनेक बहुजन समाजावर पवारांनी अत्याचार केले. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली.

यावर प्रतिक्रिया देताना अश्विनी खाडे मा. राष्ट्रवादी युवती अध्यक्ष पुणे जिल्हा पडळकर यांचा समाचार घेतला त्या म्हणाल्या की महाराष्ट्राच्या मातीची शिकवण आहे वडीलधार्‍या माणसांचा मान सन्मान द्या हेच विसरून गेलात तुम्ही पडळकर साहेब गुणवत्ता नसताना भपकेबाजपणा करून आपण पद मिळवले लोकांनी मात्र तुमचे डिपॉझिट जप्त केले आज गेली पंचावन्न दशके महाराष्ट्राच्या हितासाठी झगडणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक घटकासाठी लढणाऱ्या बाप माणसाविषयी आपण खालच्या पातळीची टीका करता आपण कोणाविषयी बोलतो आपण काय केलंय आपण कोणत्या घटकासाठी काय योगदान दिलंय याचा विचार तरी करताना बोलायचं टीका करायची म्हणून टीका करू नका पडळकर तुम्ही बोललात बरं झालं एका दृष्टीने तुमचं राजकारण संपण्याच्या वाटेने तुम्ही आता गेलात एक लक्षात ठेवा राजकारण काय तुम्ही महाराष्ट्रात फिरून दाखवा तुमच्या प्रतिकृती चा पुतळा जाळतात मी तुमचाच पुतळा करून चप्पली चा हार घालून तुम्हाला उभा करणार .आमच्या बाप माणसाची माफी मागितल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.. अश्विनी खाडे पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.